esakal | Breaking - राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

rahul gandhi.
Breaking - राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर राहुल गांधी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याची माहिती राहुल गांधींनी सोशल मीडियावरून दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करावं असं आवाहन केलं आहे.

कोरोनाची लागण झाल्याचं समोर येण्याआधीच राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा घेणार नसल्याचं सांगितलं होतं. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.