कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच रेश्‍मा यांचा खून झाला. 

सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच रेश्‍मा यांचा खून झाला. 

विजापूरजवळील कोलार गावात पुलाखाली रेश्‍मा पडकनूर यांचा मृतदेह सापडला आहे. जबर मारहाण करून त्यांचा मृतदेह टाकण्यात आल्याचे दिसून आले. या खुनाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. शेख यांनी एक महिन्यापूर्वी पडकनूर यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. रेश्‍मा यांच्या खुनाच्या घटनेनंतर शेख यांचे नाव चर्चेत आले आहे. 

रेश्‍मा पडकनूर या पूर्वी धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाच्या पदाधिकारी होत्या. सध्या त्या कॉंग्रेस पक्षात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तौफिक शेख याच्यांशी ओळख झाली. शेख यांनी गेल्या महिन्यात रेश्‍मा यांना हॉटेलमध्ये बोलाविले होते. "तुझ्या पतीजवळ भरपूर पैसा आहे, मला निवडणुकीकरिता पैशाची गरज आहे', असे म्हणून जबरदस्तीने पैशांची मागणी केली. रेश्‍मा यांनी आरडाओरड केल्यानंतर शेख यांनी गळा दाबला होता. त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Reshma Padekanur Found Dead in Vijayapura