ते नव्हं, या फोटोतला नवरदेव नेमकं कोण म्हणायचं? शशी थरूरांमुळे नेटकऱ्यांना पडला प्रश्न I Shashi Tharoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor

साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये एका विवाहाला शशी शरूर यांनी हजेरी लावली होती.

ते नव्हं, या फोटोतला नवरदेव नेमकं कोण म्हणायचं?

महाबळेश्वर (सातारा) : काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) काहींना काही कारणांमुळं नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी महिला खासदारांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता त्यांचा आणखी एक फोटो प्रचंड व्हायरलं होत आहे. लग्नातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी थरूर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

हेही वाचा: कतरिनानं 'या' चित्रपटात केलं होतं सासऱ्यांसोबत काम

साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये (Mahableshwar) झालेल्या एका विवाहाला शशी शरूर यांनीही हजेरी लावली होती. या लग्नातील जोडप्यासोबतचा थरूर यांचा फोटो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालाय. नवरदेवानं थरूर यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीय. तर, थरूर एवढ्या लांबून दोन दिवसांसाठी महाबळेश्वरमध्ये आले आणि आमच्या लग्नाचा आनंद घेतला, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा: 31 वर्षांनी भाऊ रक्षाबंधनासाठी आलेला; पृथ्वीच्या आठवणीत बहिणीचा टाहो

थरूर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळं आणि लिखाणामुळंही वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी थरूर यांचा एक सेल्फी वादात आला होता. या सेल्फीवरुन थरूर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीकाही झाली होती. थरूर यांनी संसदेतील 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी (Selfie) पोस्ट केला आणि त्यावर कोण म्हणतं की, लोकसभा (Loksabha) काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं थरूर म्हणाले होते. थरूर यांच्या याच ओळीवरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका झाली होती.

हेही वाचा: Political News : खासदार उदयनराजे भाजपलाही नकोसे?

थरूर यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीचा एक सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. थरूर यांच्या या सेल्फीमध्ये काँग्रेसच्या खासदार परनीत कौर आणि जोथिमनी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेच्या खासदार थमिजाची थंगापांडियन दिसत होत्या. व्हायरल झालेल्या फोटोंत थरूर पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा अन् गळ्यात हारही आहे. त्यावरून अनेक नेटकऱ्यांनी शरूर यांनाच ट्रोल केलंय. या फोटोतला नेमका नवरदेव कोण आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केलाय.

Web Title: Congress Leader Shashi Tharoor Attend A Couple Wedding In Mahabaleshwar Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top