"कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष असूनही शिवकुमार यांनी राष्ट्रीय स्तरावर पक्षासाठी आव्हानात्मक काळातही अथक परिश्रम केले आहेत."
बंगळूर : कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण हा एक ‘मिटवलेला विषय’ आहे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते वीराप्पा मोईली (Veerappa Moily) यांनी रविवारी म्हटले; मात्र त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये (Congress) उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.