
नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक झाली. पूर्वनियोजित बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. पक्ष संघटना, आगामी निवडणुकांसाठी आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची औपचारिक भेट घेऊन व त्यांच्यासमवेत फोटो काढून नेते राज्यात परत गेले.