कर्नाटक सरकार धोक्यात? राज्यातही आता एकनाथ शिंदे, अजितदादा तयार होणार; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये सामील झाले आहेत.
Ajit Pawar Eknath Shinde Devedra Fadanvis
Ajit Pawar Eknath Shinde Devedra Fadanvissakal
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासकामांनी आघाडी घेतली आहे. संपूर्ण जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे.

बेळगाव : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे पुढील दिवसात जिल्ह्यातील आणखी काही प्रभावी नेते भाजपमध्ये येणार आहेत. काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आहेत. यामुळे पुढील दिवसात राज्यात महाराष्ट्र पॅटर्नप्रमाणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार तयार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी (Iranna Kadadi) यांनी दिली.

गुरुवारी (ता. २५) आपल्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी ९ महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा त्याग करून काँग्रेसचा हात धरला होता. मात्र, ते पुन्हा भाजपमध्ये आले आहेत. याप्रमाणे आपल्या पक्षातून काँग्रेसमध्ये (Congress) गेलेले नेतेही लवकरच भाजपमध्ये परतणार आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Devedra Fadanvis
'सांगलीचा पुढचा खासदार मी किंवा चंद्रहार पाटील यापैकीच असेल'; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

शेट्टर यांना भाजपने मुख्यमंत्रिपद दिले होते, तरीही काही कारणामुळे ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, त्यांना त्याठिकाणी सन्मानाची वागणूक न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासह मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये गेलेले पक्षातील काही नेतेमंडळींशी संपर्क साधण्यात येत असून लवकरच त्यांचीही घरवापसी होणार असल्याचा विश्र्वास खासदार कडाडी यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar Eknath Shinde Devedra Fadanvis
कोकणात काँग्रेसला धक्का; 'हा' नेता राष्ट्रवादीत प्रवेश करताच जयंत पाटलांनी उमेदवारी केली जाहीर

सध्या राज्यातील बऱ्याच काँग्रेस आमदारांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. मतदारसंघात पुरेसा विकासनिधी उपलब्ध होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. विकासकामे राबविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासकामांनी आघाडी घेतली आहे. संपूर्ण जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com