
Congress MLA Belur Gopalakrishna supports Nitin Gadkari as next PM after Modi : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाच्या ७५व्या वर्षी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीशी जोडलं जात होतं. शिवाय, राजकीय वर्तुळात अशी चर्चाही सुरू झाली की, पंतप्रधान मोदी वयाच्या ७५व्या वर्षी निवृत्ती घेणार आहेत. शिवाय, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या एका नेत्याचं मोठं विधान समोर आलं आहे आणि ज्याची सध्या चर्चाही सुरू झाली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी असं म्हटले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५व्या वर्षी निवृत्त झाले तर, त्यांच्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान बनवावं.
याचबरोबर काँग्रेस आमदार गोपालकृष्ण यांनी असंही सांगितलं आहे की, गडकरींनी देशातील रस्ते आणि महामार्गांच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे आणि ते सामान्य लोकांशी पाठीशी उभे आहेत. म्हणूनच ते पंतप्रधान होण्याच पात्र आहेत. गडकरी सामान्य माणसासोबत आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे, लोक त्यांची सेवा आणि त्यांचा स्वभाव जाणतात.
मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना सरसंघचालक भागवत यांनी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीच्या शालीबाबत केलेल्या वक्तव्याची एक आठवण सांगितली, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीच्या सत्काराची आठवण सांगितली. वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून सत्कार केला होता. त्यावेळी मोरोपंतांनी हलक्या शब्दांत पण गंभीर अर्थाने सांगितले होते, “पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की समजावं, आता वेळ थांबायची आहे. बाजूला होऊन नव्या पिढीला संधी द्यावी.” भागवत यांनी ही आठवण सांगताना मोरोपंतांच्या साधनेचे कौतुक केले. पण या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.