काँग्रेसनं मुलाला तिकीट नाकारलं; आमदारानं थेट भाजपातच केला प्रवेश, शंभर टक्के तिकीट मिळण्याचीही दिली ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MLA Mohan Singh Rathwa joins BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

काँग्रेसनं मुलाला तिकीट नाकारलं; आमदारानं थेट भाजपातच केला प्रवेश, शंभर टक्के तिकीट मिळण्याचीही दिली ग्वाही

Gujarat Assembly Election 2022 : गेल्या 25 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यावेळची लढत केवळ भाजपा (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनंही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय.

त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. यानुसार, गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, असं असताना निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसलाय.

हेही वाचा: न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; वडिलांनंतर मुलगा बनला भारताचा 'सरन्यायाधीश'

काँग्रेसकडून राठवांच्या मुलाला तिकीट देण्यास नकार

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग राठवा (Mohan Singh Rathwa) यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांच्या मुलाला निवडणुकीत तिकीट देण्यास नकार दिला. म्हणूनच, मोहनसिंग राठवा यांनी त्यांचे पुत्र राजेंद्र सिंह आणि रणजित सिंह यांच्यासहित भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा: गाढ झोपेत असताना मोठा भूकंप; डोळ्यांदेखत घरं कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा मन हेलावून टाकणारे Photo

आता तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळणार का?

कांग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मोहन सिंह राठवा भाजप कार्यालयात पोहोचले आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस भार्गव भट्ट आणि प्रदीप सिंह वाघेला यांनी त्यांचा भाजपमध्ये समावेश केला. यावेळी राठवा यांचे पुत्र राजेंद्र सिंह आणि रणजित सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळणार का, असं त्यांना विचारलं असता राठवा यांनी याबाबत शंभर टक्के खात्री असल्याचा दावा केला. मोहन सिंग राठवा (78) हे गुजरातमधील प्रमुख आदिवासी नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. राठवा हे आतापर्यंत दहा वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि सध्या ते मध्य गुजरातमधील छोटा उदयपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम