
रायपूर : छत्तीसगडमध्ये केंद्र सरकारच्या भारतमाला रस्ते प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाबदल्यात जी नुकसान भरपाई देण्यात आली आहे, त्यात अनियमितता आढळून आली असून याप्रकरणी सीबीआयच्या वतीने तपासणी करावी अशी मागणी, छत्तीसगडमधील काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून बुधवारी विधानसभेत करण्यात आली.