Assam Politics : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आसाममध्ये भाजपवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने आसाममध्ये ‘जुमला’ कारखाना उभारल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी दिल्ली : आसाममध्ये मोदींचा जुमला कारखाना सुरू केला आहे आणि भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री त्याचे सर्वेसर्वा आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. तसेच आसाम आणि ईशान्य भारतात सत्ताबदल अटळ असल्याचा इशाराही दिला.