Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत,थरूर यांच्यातच होणार लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत, थरूर यांच्यातच होणार लढत

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत, थरूर यांच्यातच होणार लढत

काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अर्ज भरणार आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अध्यक्ष पदासाठी अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

आजपासून अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध शशी थरूर अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ति नसणार आहे यावर शिक्का मोर्तब झालं आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या चर्चा सुरु असताना काल राजस्थानमध्ये गेहलोतांनी आमदारांची बैठक घेतली आहे. काळजी करु नका मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही, असं त्यांनी आपल्या समर्थकांना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याची वेळ आली तरी राजस्थानवरची आपली पकड गहलोत सैल होऊ देणार नाहीत हे उघड झाले आहे.

Web Title: Congress President Election Election For Congress President Ashok Gehlot Vs Shashi Tharur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..