Gujarat Election : मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची थेट रावणाशी तुलना; भाजप म्हणालं, हा अपमान नाही तर..

'पंतप्रधान मोदी हे जगाचे नेते मानले जातात, अशा स्थितीत त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरणं योग्य नाही.'
Mallikarjun Kharge vs Narendra Modi
Mallikarjun Kharge vs Narendra Modiesakal
Summary

'पंतप्रधान मोदी हे जगाचे नेते मानले जातात, अशा स्थितीत त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरणं योग्य नाही.'

गुजरात निवडणुकीच्या (Gujarat Election) प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi) वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजप नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi
TMC MLA : मी 'त्यांची' माफी का मागायची? मोदी-शहांना दुर्योधन-दुशासन म्हणणाऱ्या आमदार स्पष्टचं बोलल्या

मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार टीका केलीय. संबित पात्रा म्हणाले, 'पंतप्रधानांविरोधात अशी भाषा वापरणं योग्य नाही. काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना रावण म्हटलंय. मात्र, ते गुजरातचे (Gujarat) लाल आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरणं निषेधार्ह असून यातून काँग्रेसची मानसिकता दिसून येते. हा केवळ पंतप्रधान मोदींचा (PM Modi) अपमान नाही तर प्रत्येक गुजरातींचा अपमान आहे.'

Mallikarjun Kharge vs Narendra Modi
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारची भाषा, अपशब्द वापरणं निंदनीय आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे लोहपुत्र आहेत. भारतातील प्रत्येक मागासलेला, मजूर आणि गरिबांना पुढं कसं आणता येईल यासाठी पंतप्रधान सतत काम करत आहेत. मी त्या पवित्र भारताला वंदन करतो, ज्यानं देशाला असा सुपुत्र दिला. पंतप्रधान मोदी हे जगाचे नेते मानले जातात, अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी असं वक्तव्य करणं योग्य नाही, हे निषेधार्ह आहे. मी गुजरातच्या पवित्र मातीला वंदन करतो, ज्यानं भारताला असा सुपुत्र दिला आहे. मोदींना रावण म्हणणं हा केवळ मोदीजींचा अपमान नाही तर प्रत्येक गुजरातीचा अपमान आहे, असंही संबित पात्रा यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com