esakal | प्रियांका गांधींना आसामचे पुन्हा निमंत्रण; विधानसभेत चित्र बदलणार
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi

प्रियांका गांधी यांनी आसाम भेटीदरम्यान चहामळ्यातील मजूर विशेषत: महिलांशी संवाद साधल्याने कॉंग्रेसला सकारात्मक वातावरण झाल्याची चर्चा आहे.

प्रियांका गांधींना आसामचे पुन्हा निमंत्रण; विधानसभेत चित्र बदलणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - Assam Assembly Election 2021 कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा आसाम दौरा यशस्वी ठरल्याने आसामच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी पुन्हा आसाम दौऱ्यावर यावे, अशी इच्छा आसाम कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. प्रियांका गांधी यांनी आसाम भेटीदरम्यान चहामळ्यातील मजूर विशेषत: महिलांशी संवाद साधल्याने कॉंग्रेसला सकारात्मक वातावरण झाल्याची चर्चा आहे. राज्य कॉंग्रेस कमिटीने केंद्रीय नेतृत्वाला लिहलेल्या पत्रात प्रियांका गांधी यांनी आणखी एकदा आसामला भेट द्यावी, असे म्हटले आहे.

प्रदेश कॉंग्रेसच्या अहवालात म्हटले की, आसामचा दौरा यशस्वी झाल्याने आगामी विधानसभेत चित्र बदलू शकते. आसाममध्ये तीन टप्प्यात २७ मार्च ते ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रियांका गांधी यांच्यापर्यंत आसाम कॉंग्रेसचे म्हणणे पोचले असून त्यांनी दुसऱ्या दौऱ्याची देखील तयारी सुरू केली आहे. आसामच्या तारखा निश्‍चित कराव्यात असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्रियांका गांधी सध्या आसामकडे लक्ष देत असल्या तरी अन्य निवडणूक राज्यातही प्रचारासाठी जाणे आवश्‍यक आहे, असे सूत्राने म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गेल्या अनेक काळापासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीच कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. दुसरीकडे प्रियांका गांधी यांनी आपला प्रचार अमेठी आणि रायबरेलीपर्यंतच मर्यादित ठेवला. परंतु सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी केल्यानंतर प्रियांका गांधी सक्रिय झाल्या आहेत. आसामला गेल्यानंतर त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार देशभरात प्रचार करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

सोनिया गांधींची शक्यता कमीच
पाच राज्यात कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी जातील की नाही, याबाबत पक्षाकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र पाच राज्यातील मतदारांपर्यंत सोनिया गांधी यांचा आवाज पोचवण्यासाठी डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. तसेच व्हिडिओ संदेशामार्फत मतदानाचे आवाहन देखील त्या करू शकतात. यादरम्यान, राहुल गांधी अन्य निवडणूक राज्यात केरळ, तमिळनाडूत व्यग्र आहेत.

loading image