
Congress Protest: पीएम हाऊसकडे निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी फरफटत नेलं
नवी दिल्ली : देशभरात बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन सुरू आहे. पक्षाचे नेते सर्व राज्यांमध्ये निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनला घेराव जाहीर केला होता. त्यानंतर या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र काँग्रेसनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊन विरोध प्रदर्शन केलं. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Congress Protest news in marathi)
खासदार राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं आहे. प्रियंका गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह पीएम हाऊसकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी प्रियंका यांनी बॅरेकेड्स ओलांडत पीएम हाऊसकडे आगेकूच केली होती. यावेळी पोलिसांनी प्रियंका गांधी यांनी अक्षरश: फरफटत नेलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र प्रियंका गांधी यावर थांबल्या नसून त्यांनी पोलिसांसमोर रस्त्यावरच धरणे दिले.
महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संसदेत बोलू दिले जात नाही, असे ते म्हणाले. अटक केली जात आहे. देशातील लोकशाही संपत असताना तुम्हाला कसे वाटते, असे राहुल म्हणाले.
महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरूच असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.