Rahul Gandhi : सोनिया गांधींना 'नूरी' नावाचे श्वान भेट देणं राहुल गांधींना पडलं महागात; जाणून घ्या नेमकं प्रकरण
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पार्टीतील एका नेत्याने राहुल गांधींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधींनी आई सोनिया गांधींना जागतिक पशु दिना दिवशी नूरी नावाची श्वान भेट दिली होती. यावेळी त्यांनी एक विडिओ पोस्ट केला होता. तक्रारदाराने राहुल गांधींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते मोहम्मद फरहान यांनी याचिकेत म्हटलं की, कुत्रीच्या नावामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कारण की "नूरी" हा शब्द इस्लामशी संबधित आहे, आणि या शब्दाचा उल्लेख कुरानमध्ये देखील आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फरहान यांचे वकिल मोहम्मद अली यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या विरोधात कलम २९५ ए ( धार्मिक भावना दुखावणे ) या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात यावा, यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहोत.
एआयएमआयएमच्या नेत्यांना राहुल गांधींनी भेट दिलेल्या कुत्रीचे नाव वेगवेळ्या वर्तमान पत्रात, फेसबुक पेज, युट्युब चॅनल यामधून समजले. राहुल यांनी सोनिया गांधींना भेट दिलेल्या कुत्रीचे नाव बदलावे आणि सार्वजनिक रित्या माफी मागावी अशी मागणी केली होती,पण त्यांनी तसे न केल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागले, असं वकील म्हणाले
कोर्टाने फरहान यांना ८ नोव्हेंबरला म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे, त्यानंतर न्यायालयात राहुल गांधींना बोलावले जाऊ शकते. त्यामुळे याप्रकरणात पुढे काय होईल हे पाहावं लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.