
नवी दल्ली : परदेशातून परतलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांतील सदस्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काँग्रेसने आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठकीच्या मागणीचा सूचकपणे पुनरुच्चार केला आहे. तसेच, ‘‘सरकार संसदेत राष्ट्रीय सुरक्षेवर आणि परराष्ट्र धोरणावर चर्चा घडवून आणेल काय,’’ असा सवालही केला आहे.