शंभर नेत्यांच्या पत्राचा  दावा काँग्रेसने फेटाळला 

वृत्तसंस्था
Tuesday, 18 August 2020

काँग्रेसच्या १००नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून पक्ष नेतृत्वाल बदल करण्याची मागणी केल्याचा दावा काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून निलंबित केलेले नेते संजय झा यांनी सोमवारी ट्टिटरवरून केला

नवी दिल्ली - काँग्रेसच्या १०० नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून पक्ष नेतृत्वाल बदल करण्याची मागणी केल्याचा दावा काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून निलंबित केलेले नेते संजय झा यांनी सोमवारी ट्टिटरवरून केला. मात्र पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तो फेटाळून लावला. 

सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अशी कोणतेही पत्र सोनिया गांधी यांना लिहिलेले नाही. फेसबुकच्या प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने रचलेला हा डाव आहे. सुरजेवाला यांनी भाजपवर हल्ला करताना लिहिले आहे की, भाजपचा डाव असलेले ही खोटी माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर ही माहिती पसरविण्याची सूचना ‘स्पेशल मिसइन्फरर्मेशन ग्रुप ऑन मीडिया-टीव्ही डिबेट गायडन्स’ ने दिली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी संजय झा यांनी ट्विट करून लिहिले होते की, काँग्रेसचे सुमारे १०० नेते (खासदरांसह) राज्यांतील स्थितीवरून व्यथित आहेत. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा यांना पत्र लिहिले आहे. त्यात राजकीय नेतृत्वात बदल आणि काँग्रेस कार्यकारी समितीत पारदर्शी निवडणुकीची मागणी केली असल्याचा दावा झा यांनी केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress rejected the claim of a letter from a hundred leaders