Rajasthan Elections: राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजेंचा मतदारसंघ ठरला

Rajasthan Elections
Rajasthan Elections

नवी दिल्ली- राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ३३ जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सदारपुरा, सचिन पायलट टोंक मतदारसंघातून निवडणूक लढवतील. सीपी जोशी नाथद्वारा, दिव्या मेहरा ओसीयन, गोविंद सिंह दोतसारा लाछेमानगडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. (Congress releases the first list of 33 candidates for the upcoming Rajasthan Assembly Elections )

Rajasthan Elections
Assembly Elections : राजस्थान विधानसभेसाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात?, केली 'ही' तयारी

दुसरीकडे भाजपकडून राजस्थानसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा समावेश असून त्या झलारपटन मतदारसंघातून निवडणूक लढवतील. राजेंद्र राठोड तंरगपूरमधून निवडणूक लढवतील. ज्योती मिरधा या नागपूरमधून निवडणूक लढवतील. भाजपच्या दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपकडून पहिल्या यादीमध्ये वसुंधरा राजेंना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दुसऱ्या यादीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनाही मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने संतूलन राखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.

नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान,तेलंगणा आणि मिझोराममध्ये ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होणार आहेत. त्यानंतर ३ डिंसेंबरला निकाल लागतील. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा असून २५ तारखेला निवडणूक होणार आहे.

Rajasthan Elections
Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

२०१८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने १०० जागा जिंकल्या होत्या. भाजपने ७३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले होते. त्यांना सहा जागा जिंकलेल्या बहुजन समाज पार्टीने पाठिंबा दिला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com