esakal | बिहारमध्ये काॅँग्रेस-राजद आघाडीला ‘ब्रेक’
sakal

बोलून बातमी शोधा

desh

बिहारमध्ये काॅँग्रेस-राजद आघाडीला ‘ब्रेक’

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा : बिहार विधानसभेच्या दोन जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राजदकडून उमेदवार उतरवल्याने नाराज झालेल्या कॉंग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला. कॉंग्रेसने कुशेश्‍वरस्थान मतदारसंघातून अतिरेक कुमार आणि तारापूर मतदारसंघातून राजेशकुमार मिश्र यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे बिहारमध्ये १९९८ पासून कॉंग्रेस आणि राजद यांच्यातील आघाडी पुन्हा एकदा तुटली असून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, डाव्या आघाडीने परिस्थितीनुसार रणनीती आखणार असल्याचे म्हटले आहे.बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी केवळ कॉंग्रेसच रोखू शकते, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने महागठबंधन तुटण्यास राजदला जबाबदार धरले आहे. दोन्ही मतदारसंघात राजदने उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय एकतर्फी होता, असे काँग्रेसने म्हटले आहे. राजदकडूनच महाआघाडीला सर्वाधिक नुकसान झाल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसबरोबर राजदबरोबर सर्वप्रथम १९९८ मध्ये आघाडी झाली होती. त्यावेळी राजदने काँग्रेसला लोकसभेच्या २१ जागा दिल्या होत्या. यादरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने बिहारमध्ये राबडीदेवी यांचे सरकार अस्थिर केले होते आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. १९९९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा बिहारमध्ये राजदने काँग्रेसच्या जागा कमी करत २१ वरून १६ वर आणल्या.

हेही वाचा: Lakhimpur : राहुल अन् प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

२००० मध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राजदने वेगळी चूल मांडली. परिणामी मुख्यमंत्री असतानाही राबडीदेवी राघोपूर आणि सोनपूर यासारख्या पारंपरिक मतदारसंघातून पराभूत झाल्या. त्यावेळी राजदला बहुमत मिळाले नाही. मात्र काँग्रेसच्या २३ आमदारांचा पाठिंब्यावर राबडीदेवी पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजदने काँग्रेसला केवळ चार जागा दिल्या. त्यात तीन जागा काँग्रेसने जिंकल्या. त्याचवेळी लालू प्रसाद यादव यांना केंद्रात रेल्वेसारखे महत्त्वाचे मंत्रालय दिले. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत राजदने कॉंग्रेसला केवळ तीनच जागा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राजद-कॉंग्रेस महाआघाडी पुन्हा विस्कळित झाली. परिणामी २००९ च्या लोकसभेत आणि २०१० च्या विधानसभा निवडणुकीत राजदला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत राजदला केवळ २२ जागा मिळाल्या.

जेडीयू आमदारांच्या निधनाने जागा रिक्त

बिहारमध्ये तारापूर आणि कुशेश्‍वरस्थान मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर जेडीयूचे आमदार निवडून आले होते. कुशेश्‍वरस्थान येथून आमदार शशीभूषण हजारी तसेच तारापूर येथील आमदार मेवालाल चौधरी यांचे निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी ३० ऑक्टोबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. आठ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

बिहारमध्ये तारापूर आणि कुशेश्‍वरस्थान मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर जेडीयूचे आमदार निवडून आले होते. कुशेश्‍वरस्थान येथून आमदार शशीभूषण हजारी तसेच तारापूर येथील आमदार मेवालाल चौधरी यांचे निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी ३० ऑक्टोबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. आठ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

loading image
go to top