esakal | काँग्रेस एखाद्या व्यवसायासारखं सरकार चालवते; ज्योतिरादित्य सिंधियांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

jyotiraditya sindhiya.jpg

सिंधिया मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. भारती यांना भेटल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

काँग्रेस एखाद्या व्यवसायासारखं सरकार चालवते; ज्योतिरादित्य सिंधियांचा हल्लाबोल

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

भोपाळ- भाजप नेते आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मध्ये प्रदेशमध्ये जनतेचा मोह काँग्रेसवरुन उठून गेला आहे. कारण काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा येथे व्यापार आणि भष्टाचाराचे सरकार सुरु होते, असं ते म्हणाले आहेत. सिंधिया मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. भारती यांना भेटल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

गेहलोत यांच्या राज्यात 'कमल'नाथ पॅटर्न अवघडच
मध्य प्रदेशमध्ये 15 महिने काँग्रेस सत्तेत होती, पण याकाळात केवळ भ्रष्टाचारच सुरु होता. 90 दिवस मी गप होतो कारण संपूर्ण देश आणि राज्य कोरोना महामारीमुळे हैराण होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह राजनैतिक भाकर भाजप होते. या काळात एकही जनसेवेचे कार्य झालं नाही. 15 महिने त्यांनी जे केलं ते कोरोना काळातही सुरु होतं. मध्य प्रदेशात काँग्रेसने अगदी व्यवसायासारखं सरकार चालवलं. आता त्यांना उत्तर देण्यासाठी मी मैदानात आलो आहे, असं सिंधिया यावेळी म्हणाले आहेत.  

सिंधिया यांनी यावेळी राजस्थानमधील घडामोडींवर भाष्य करणे टाळले. मी उमा भारती यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. श्रद्धेय उमा भारती यांच्यासोबत माझे नेहमीच सौदार्हाचे संबंध राहिली आहेत. त्यांचा मला आज आशीर्वाद प्राप्त झाला. मी सौभाग्यशाली आहे, असं सिंधिया यावेळी म्हणाले.

उभा भारती यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. जेव्हा मी आठ वर्षाची होती, तेव्हा मला अम्माजी कडून ( ज्योतिरादित्य सिंधिया यांचा आजी) खूप प्रेम मिळालं आहे. ज्योतिरादित्य यांना मी लहानपणापासून ओळखते. माझा आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबत आहे. त्यांना मध्य प्रदेश आणि देशात मोठी किर्ती मिळावी. त्याचं नावचं ज्योतिरादित्य आहे.

आता 'या' राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; सर्वच व्यवहार राहणार बंद
दरम्यान, राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर केला होता. पायलट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पण पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांचे पुढील मार्गक्रमण कसे असेल याकडे लक्ष्य असणार आहे. काही महिन्यांपूर्वी  ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता सचिन पायलट हेही बाहेर पडल्याने काँग्रेसची पीछेहाट होण्याची शक्यता आहे.