कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखराम शर्मांचं निधन, टेलिकॉम घोटाळ्यात होते दोषी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukhram sharma

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखराम शर्मांचं निधन, टेलिकॉम घोटाळ्यात होते दोषी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखराम शर्मा यांचं निधन झाल्याचं ट्वीट हिमाचल प्रदेश कॉंग्रेसने केलंय. सुखराम शर्मांवर AIIMS ( All India Institute Of Medical Science) मध्ये ब्रेन स्ट्रोकवर उपचार सुरु होते. सुखराम शर्मा हे नरसिम्हा रावच्या सरकारमध्ये दूरसंचारमंत्री होते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ते तीनदा निवडून आले होते तर पाच वेळा विधानसभेतून निवडून आले होते. (Congress senior leader Sukhram passes away)

टेलिकॉम घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यानंतर मात्र त्यांची लोकप्रियता कमालीची घटली होती. १९९६ साली नरसिम्हा रावांच्या सरकारमध्ये ते दूरसंचारमंत्री होते. सीबीआयच्या तपासणीत पंडीत सुखराम यांच्या घरातून 3 कोटी ६0 लाख रुपये मिळाले होते, यावरून प्रचंड वादंग निर्माण झाला होता. तेव्हाच्या चॅनल आणि वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात याविषयी अनेक बातम्या आल्या होत्या. यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर लाच घेऊन टेलिकॉमचे परवाने दिल्याचा आरोप करत त्यांचं कॉग्रेसचं सदस्यत्वच रद्द केलं होतं. नंतर मात्र त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्यात आलं होतं.

१८ नोव्हेंबर २०११ ला त्यांना टेलिकॉम घोटाळ्याप्रकरणी दोषी धरण्यात आलं होतं, सुप्रीम कोर्टानेही दिल्ली हायकोर्टाचा निर्णयावर शिक्कामोर्तब करत त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली होती. सलमान खानची बहिण अर्पिता खानचे ते आजेसासरे होते.

Web Title: Congress Senior Leader Sukhram Sharma Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top