
Cow Hug Day : 'हिंदी राष्ट्रवादींनी ‘Guy' ऐवजी गाय ऐकलं अन्...; थरूर यांचा खोचक टोला
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शनिवारी (11 फेब्रुवारी) 'गाय हग डे'चे आवाहन मागे घेतल्याबद्दल केंद्र सरकार आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाची खिल्ली उडवली.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केले की, "मला विश्वास आहे की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोकांना त्यांच्या जोडीदाराला (Guy) मिठी मारण्याची तोंडी सूचना देण्यात आली होती, परंतु हिंदी राष्ट्रवादींनी 'Guy' शब्दाऐवजी Gaay असा ऐकला. तसेच सरकार माझ्या चुटकुल्यांना घाबरलं का? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने 14 फेब्रुवारी रोजी 'गाय हग डे' साजरा करण्याचे आवाहन करणारी नोटीस मागे घेतली. नोटीसमध्ये गायींना मिठी मारल्याने समृद्धी येईल आणि सामूहिक प्रसन्नता वाढेल, असा दावा करण्यात आला होता.
अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने व्हॅलेंटाईन डे 'काउ हग डे' म्हणून साजरा करण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली होती, परंतु ती आता मागे घेण्यात आली आहे. अनेकजण मीम्स बनवून याची खिल्ली उडवत आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही शुक्रवारी (10 फेब्रुवारी) काऊ हग डेचे आवाहन मागे घेतल्यानंतर हे कोणाचे विचार होते, अशा शब्दात खिल्ली उडवली. त्यांनी ट्विट करून विचारलं की, "सर्वप्रथम सांगा ही कल्पना कोणाची होती?"