Rahul Gandhi : काँग्रेसची टीका, मोदी सरकारचा अकरा वर्षांचा कार्यकाळ केवळ 'प्रचाराचा'; केंद्र सरकार २०४७ चे स्वप्न विकते
New Delhi : काँग्रेसने मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर तीव्र टीका केली आहे. हा काळ जबाबदारी किंवा बदलाचा नसून केवळ प्रचाराचा असल्याचे म्हटले आहे, तसेच केंद्र सरकार २०२५ वर लक्ष न देता २०४७ चे स्वप्न विकत असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : ‘‘केंद्रातील सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारचा कार्यकाळ हा जबाबदारीचा किंवा बदलाचा नसून केवळ प्रचाराचा आहे. केंद्र सरकार २०२५ वर बोलणे सोडून २०४७ चे स्वप्न विकत आहे,’’ अशी तोफ काँग्रेसने सरकारवर डागली आहे.