Jairam Ramesh : ‘नीती आयोगा’ची बैठक म्हणजे ढोंग; काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका, जयराम रमेश
Political News : नीती आयोगाच्या बैठकीवर काँग्रेसने जोरदार टीका करत ही बैठक म्हणजे ढोंगीपणा व दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांनी सत्ताधाऱ्यांवर सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा, आणि संस्थांची स्वायत्तता चिरडण्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : विकसित भारताच्या संकल्पनेवर होणाऱ्या नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची बैठक म्हणजे ढोंगीपणा असून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याची तोफ कॉंग्रेसने आज डागली.