Shashi Tharoor : थरूर यांच्या विधानावर काँग्रेस नाराज; ‘पहिल्या सर्जिकल स्ट्राइक’बाबत दुमत; बचावासाठी भाजप सरसावले
Political Controversy : ‘पहिला सर्जिकल स्ट्राइक भाजप सरकारच्या काळात झाला’ या शशी थरूर यांच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. गांधी कुटुंबावर टीका केल्यामुळेच थरूर यांच्यावर टीका होतेय, असा भाजपचा दावा आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानवर पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ भाजप सरकारच्या काळात झाल्याच्या खासदार शशी थरूर यांच्या विधानामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षातूनच रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर, त्यांच्या बचावासाठी भाजप सरसावल्याचे चित्र आज दिसले.