Viral Video: पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याचे केस ओढले; कारवाई होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest

Viral Video: पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्याचे केस ओढले; कारवाई होणार

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभरात आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान यावेळी महाराष्ट्रातही आंदोलन पेटलं असून आमदार भाई जगताप आणि अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर दिल्लीतील युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असताना केस ओढल्यामुळे सदर पोलिसांवर कारवाई होणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं असून यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. यादरम्यान युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांच्या केसाला धरून खेचण्यात आलं आहे. त्यानंतर श्रीनिवास यांनी ट्वीट करत लोकशाही कुठे आहे असा सवाल केला आहे. या घटनेनंतर सदर पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

स्वतंत्र भारतात, काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाच्या मुख्यालयाच्या बाहेरही येऊ शकत नसतील तर लोकशाहीचा अर्थ काय? सरकारला भिती कशाची आहे? असा सवाल श्रीनिवास यांनी केला आहे. दरम्यान नॅशनल हेरॉल्डमधील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक होत असून त्यांच्याकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.

Web Title: Congress Soniya Gandhi Ed Enquiry Protest Police Pulling Hair Take Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..