लंडनमधील पत्रकार परिषद काँग्रेसनेच घडवून आणली: प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जगात भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नाही. राफेल, सीव्हीसी प्रकरणी त्यांना आदेश मानायचे नाहीत. भारताच्या संविधानिक अस्मितेला धोका पोहचविण्याचे काम करत आहे. 2014 मध्ये आमचे सरकार नव्हते, तर काँग्रेसचे सरकार होते.

नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.

'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे. यानंतर देशभरात राजकीय वादळ उठले असून, भाजपने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, की जगात भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नाही. राफेल, सीव्हीसी प्रकरणी त्यांना आदेश मानायचे नाहीत. भारताच्या संविधानिक अस्मितेला धोका पोहचविण्याचे काम करत आहे. 2014 मध्ये आमचे सरकार नव्हते, तर काँग्रेसचे सरकार होते. पराभव झाकण्यासाठी राहुल गांधी खोटे आरोप करत आहे. हँकरने पत्रकार परिषदेत कोणताही पुरावा दिलेला नाही. हॅकरची पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या आशीष रे याने राहुल गांधींची भेट घेतली होती. 2019 च्या पराभवाचे कारण शोधण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचे काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असून, हे अशोभनीय आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress sponsored event designed to defame the popular mandate of India says Ravishankar Prasad