esakal | सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसची धडपड; तातडीने बोलावली बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसची धडपड; तातडीने बोलावली बैठक

राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला.

सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसची धडपड; तातडीने बोलावली बैठक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

राज्य कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर आदी प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत सरकार वाचविण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 
लोकसभेचा निकाल उद्यावर आला असताना वेणुगोपाल यांच्या बंगळुरातील आगमनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व देण्यात येत आहे. निवडणुकीनंतर काही माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील आघाडीची पीछेहाट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा युती सरकारच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

'एक्‍झिट पोल' जाहीर झाल्यानंतर भाजपने "ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढविल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बंडखोर नेते रमेश जरकीहोळी यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. आमदार रोशन बेग यांनी बंडखोरीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कुंदगोळ व चिंचोळी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाबाबतही साशंकता आहे. त्यामुळे सरकारची पूर्वीपेक्षा चिंता वाढली आहे. या सर्व बाबींवर नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी वेणुगोपाल यांच्यामार्फत संदेश पठवून सरकार वाचविण्यासाठी सर्व ते उपाय करण्याची सूचना केली आहे.  

loading image
go to top