शहरी नक्षलवाद्यांना वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात : नरेंद्र मोदी

Congress supporting these urban Maoists says Narendra Modi
Congress supporting these urban Maoists says Narendra Modi
Updated on

बस्तर : ''ज्या लोकांच्या मुलांच्या हातात लेखणी (पेन) असायला हवी. मात्र, राक्षसी मनोवृत्तीचे लोक त्यांच्या हातात बंदूक देत आहेत. शहरी नक्षलवादी अशाप्रकारचे जीवन जगत आहेत आणि आदिवासी मुलांचे जीवन उद्धवस्त करत आहेत. काँग्रेसची लोकं अशा शहरी नक्षलवाद्यांना वाचविण्यासाठी मैदानात उतरत आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

छत्तीसगडमधील बस्तर या नक्षलग्रस्त भागातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी शहरी नक्षलवादावर भाष्य केले. ते म्हणाले, ''नक्षलवादी हे वातानुकूलित (एसी) खोलीत बसतात. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोलद्वारे आदिवासी भागातील तरुणांचे आयुष्य उद्धवस्त करत आहेत आणि अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे? पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात'', असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, ''काँग्रेसने शहरी नक्षलावादावर उत्तर दिले पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई केल्यावर काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी मैदानात का उतरते? अशा लोकांपासून रक्षण करण्यासाठी छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ फुललेच पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com