राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर आपली आघाडी भक्कम केली आहे. काँग्रेसने पंचायत समितीच्या २,४६३ आणि जिल्हा परिषदेच्या ६६ जागांवर विजय मिळवला आहे..पंचायत समितीच्या ४,९५८ जागांपैकी काँग्रेसने २,४६३ जागांवर विजय मिळवला असून, भारतीय जनता पक्षाने १,५१२ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने ३५४ जागा, भारत आदिवासी पक्षाने (BAP) १६८, CPI(M) ने ४३, BSP ने ३६, AAP ने २ आणि अपक्ष उमेदवारांनी ३८० जागांवर बाजी मारली आहे..पंचायत समिती निकालकाँग्रेस: २,४६३भाजप: १,५१२अपक्ष: ३८०राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष: ३५४भारत आदिवासी पक्ष: १६८CPI(M): ४३BSP: ३६AAP: ०२.जिल्हा परिषद निकालातही काँग्रेस आघाडीवरकाँग्रेस: ६६भाजप: २५CPI(M): ०३राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (RLP): ०२अपक्ष उमेदवार: ०१.राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ३७ जिल्ह्यांतील ४१९ पंचायत समित्यांमध्ये जिल्हा परिषदच्या १,२७५ प्रभागांसाठी ४,०६९ उमेदवार आणि पंचायत समितीच्या ७,५४३ प्रभागांसाठी २५,१०८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कोटा, बारां, करौली आणि श्रीगंगानगरमधील ३८ पंचायत समित्यांतर्गत जिल्हा परिषदचे १२८ प्रभाग आणि पंचायत समितीचे ७०२ प्रभाग येतात. सर्व ४१ जिल्ह्यांमध्ये मिळून १,४०३ जिल्हा परिषद प्रभाग आणि ४५७ पंचायत समित्यांचे ८,२४५ पंचायत समिती प्रभाग समाविष्ट आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.