
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बेताल वक्तव्ये करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फटकारले आहे. पक्षाच्या नेत्यांची मते ही काँग्रेसची अधिकृत भूमिका नसल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच कार्यकारिणीने संमत केलेल्या ठरावाच्या बाहेर बोलणे पक्षाच्या भूमिकेचे उल्लंघन मानले जाईल, अशी तंबी काँग्रेस नेतृत्वाने पक्षातील वाचाळवीरांना दिल्याचे समजते.