कोविड संकटावर तोडग्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा; काँग्रेसची राष्ट्रपतींना विनंती

देशात कोरोनाच्या उद्रेकानं मोठा हाहाकार माजला आहे.
parliment
parliment

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या उद्रेकानं (corona crisis) मोठा हाहाकार माजला आहे. या संकटावर मात करण्यासाठी त्यावर सविस्तर चर्चा घडावी याकरता कोरोना संकटासाठीचं संसदेचं विशेष अधिवेशन (Special Session of Parliment) बोलवावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. यासाठी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी (Congress MP Adhir ranjan Chaudhari) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. (Congress writes to Pres Ramnath Kovind urging for special session of the Parliament over the COVID19 crisis)

चौधरी यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "देशात सध्या कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. या परिस्थितीची तुम्हालाही नेमकी माहिती आहेच. या संकटाच्या परिस्थितीत माझी तुम्हाला विनंती आहे की, या संकटाच्या स्थितीवर मात करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. देशातील जवळपास सर्वच मतदारसंघात कोरोनाचं संकट आहे. विविध राज्यांमधील या मतदारसंघांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला या विशेष अधिवेशनाद्वारे आपल्या मतदारसंघातील जनतेचं दुःखद जीवन सुकर करण्यासाठी मार्ग काढता येईल.

parliment
काँग्रेसला मुहूर्त मिळेना! अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

या प्रश्नी आमच्या विनंतीवर तुम्ही कार्यवाही कराल याची आम्ही वाट पाहत आहोत, अशा शब्दांत चौधरी यांनी राष्ट्रपतींकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com