जैसा राजा वैसी प्रजा: राहुल गांधीनंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party

"जैसा राजा वैसी प्रजा": राहुल गांधीनंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांचा नेपाळमधील एका पबचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांना भाजपाने ट्रोल केलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून भाजपाने आता कॉंग्रेसवर आपली मुक्ताफळे उधळली आहेत.

(Youth Congress Party Viral Video)

नागपुरातील युथ कॉंग्रेसच्या युवकांचा बारमधील डान्सचा व्हिडीओ भाजपा नेत्यांनी शेअर करत टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते शहनाज पूनावाला यांनी हा व्हिडीओ शेअर करत, INC म्हणजे I Need Celebration And Party असं म्हणत टीका केली आहे. दरम्यान यासंदर्भातील ट्वीट करत त्यांनी म्हटलंय की, हे पार्टी करण्यासाठीचं प्रशिक्षण आहे का? हे आहेत महाराष्ट्र युथ कॉंग्रेसचे नवीन पदाधिकारी आहेत. पार्टी ट्रेनिंग कॅम्प सुरु असून जैसा नेता वैसे कार्यकर्ते." असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांचा नेपाळमधील पबमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता परत नागपूरातील युथ कॉंग्रेसच्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर भाजपाकडून निशाणा साधला जात आहे. सध्या कॉंग्रेस पक्ष बॅकफूटला जात असताना राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते पार्टी करण्यात मग्न आहेत. सध्या देशभरात अनेक प्रश्न उभे असून कॉंग्रेसचे कार्यकर्ते गाण्यावर नाचत आहेत असं ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्र राज्य वेगळ्या समस्यांचा सामना करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते पार्टी आणि डान्स करण्यात व्यस्त आहेत. नायक नही खलनायक हू मै. पीने दे पीने दे ओ मरजानी अशा गाण्यावर नेते नाचत आहेत." असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

Web Title: Congress Youth Party Video Viral Bjp Troll

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpCongressSakalParty
go to top