Ravi Shankar Prasad : घटना बदलण्याचा काँग्रेसचा डाव; शिवकुमार यांच्या विधानावरून भाजप नेत्यांचा हल्लाबोल
D. K. Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुस्लिम आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल करण्याची वाणी उचलली आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर घटनाबाह्य आरक्षण देण्याचा आरोप करत काँग्रेसच्या डावावर टीका केली.
नवी दिल्ली : ‘‘कर्नाटक सरकारने कंत्राटामध्ये मुस्लिमांना चार टक्क्यांचे घटनाबाह्य आरक्षण दिले आहे. गरज पडली तर हे आरक्षण टिकविण्यासाठी राज्यघटनेत बदल केला जाईल, अशी भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली.