

Uproar Over Tiranga March in Delhi, Over 150 Protesters in Police Custody
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पुकारलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चादरम्यान पोलिसांकडून मोठी धरपकड करण्यात आली आहे. मोर्चाला परवानगी नाकारत दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांच्यासह तब्बल १५० हून अधिक आंदोलक आणि तरुणांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे कॅनॉट प्लेस परिसरात अभूतपूर्व गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.