CBI, ED, IT या संविधानिक संस्था उद्ध्वस्त होताहेत; तेजस्वी यादवांचा भाजपवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी सातत्यानं भाजपवर निशाणा साधला आहे.
tejaswi yadav and Narendra modi
tejaswi yadav and Narendra modi
Updated on

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तेत आल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाजपवर सातत्यानं हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. CBI, ED, IT या आपल्या घटनात्मक संस्था एकामागून एक उद्ध्वस्त होत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी केला. (Constitutional institutions CBI ED IT are being destroyed Tejashwi Yadav attack on BJP)

महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात आणि झारखंडमध्ये भाजपची नाटकं आपण पाहिली आहेत. इथं जे घाबरतील त्यांना घाबरवा, जे विकले जातील त्यांना खरेदी करा. आपल्या घटनात्मक संस्था सीबीआय, ईडी, आयटी एक एक करून उद्ध्वस्त होत आहेत, त्यांची अवस्था पोलिस ठाण्यापेक्षाही वाईट बनली आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.

tejaswi yadav and Narendra modi
GST on house rent: आता घरभाड्यावर १८ टक्के जीएसटी! तुमचाही समावेश होतोय का?

ते कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत? बिहारी घाबरणारे नाहीत; आम्ही 'टिकाऊ' आहोत, 'बिकाऊ' नाही...आम्ही नितीशजींना दोष दिला पण आम्ही समाजवादावर श्रद्धा असलेल्या एकाच घरातील आहोत. प्रत्येक घरात भांडणं होतात, पण देशाची परिस्थिती पाहता नितीशजींच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com