अदानी बंदरावर किरणोत्सारी कार्गो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अदानी बंदरावर किरणोत्सारी कार्गो?
अदानी बंदरावर किरणोत्सारी कार्गो?

अदानी बंदरावर किरणोत्सारी कार्गो?

नवी दिल्ली : गुजरातमधील मुंद्रा येथील अदानी बंदरावर पाकिस्तानमधील कराचीहून चीनमधील शांघायला जाणारे एक मालवाहू जहाज अधिकाऱ्यांनी गुरुवारी जप्त केले. त्यात किरणोत्सारी साहित्य असण्याची शक्यता आहे.

जहाजावर अनेक कंटेनर होते. सीमाशुल्क आणि महसुल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. कार्गोवर बिगर-धोकादायक असा शिक्का मारण्यात आला होता, पण कंटनेरमध्ये सातव्या श्रेणीतील साहित्य सापडले. ही श्रेणी किरणोत्सारी साहित्य सूचित करते. हे कंटेनर मुंद्रा किंवा भारतातील इतर कोणत्याही बंदरासाठी पाठविण्यात आलेले नाहीत, अशी माहिती अदानी बंदर आणि सेझ या कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली.

कंटेनर उतरविण्यात आला असून पुढील तपासणी सुरु आहे. यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल. अदानी समूह राष्ट्रीय सुरक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो आणि कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

loading image
go to top