Tamil Nadu : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानांवर संताप व्यक्त केला. ‘पीएम श्री’ योजनेच्या अंमलबजावणीवरही त्यांनी केंद्र सरकारला ठणकावले.
चेन्नई : ‘‘केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे बोलणे उद्धटपणाचे असून ते स्वत:ला राजेच समजतात. त्यांनी आपल्या जिभेला आवर घालावा,’’ असा संताप तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केला आहे.