
नवी दिल्ली : चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या चित्रप्रदर्शनामुळे राजधानी दिल्लीत आज वादंग निर्माण झाला. या प्रदर्शनातील हिंदू देवदेवतांच्या वादग्रस्त चित्रांच्या प्रदर्शनावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ मकरंद आडकर तसेच हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पार्लमेंट स्ट्रीट पोलिसठाण्यात तक्रार नोंदविली आणि संबंधित चित्रे जप्त करण्याची मागणी केली.