Clash Over B.R Ambedkar Statue: पाटण्यात आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तरुणाची गोळ्या झाडून हत्या, ३ जणांना अटक

Clash Over B.R Ambedkar Statue: बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून पाटण्यातील मकसूदपूरमध्ये बुधवारी रात्री दलित आणि यादव यांच्यात हिंसक चकमक झाली. यावेळी एका तरुणावर गोळीबार झाला. तसेच अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
Clash Over B.R Ambedkar Statue
Clash Over B.R Ambedkar Statueesakal

Clash Over B.R Ambedkar Statue

बिहारमध्ये पाटणा येथील पाटलापूर पंचायत अंतर्गत मकसूदपूर गावात बुधवारी रात्री उशिरा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात एका १९ वर्षीय दलित तरुणावर गोळीबार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी गुरुवारी तीन जणांना अटक करण्यात आली. गोळीबारात विक्रम कुमारचा मृत्यू झाला, अशी माहिती पाटणा (पश्चिम) पोलीस अधिक्षक अभिनव धीमान यांनी सांगितले. 

दलित लोकांनी सरकारी जमिनीवर आंबेडकरांचा पुतळा बसवला असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्याला यादव जातीच्या लोकांनी विरोध केला होता. यावरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.

बुधवारी रात्री दोन्ही बाजू समोरासमोर आल्या. एका बाजूने गोळीबार झाला, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Clash Over B.R Ambedkar Statue
Loksabha Election 2024 : अहमदनगर ४२, तर शिर्डीसाठी ३१ अर्जांची विक्री

ही घटना बुधवारी रात्री घडली. रात्री 9.30 च्या सुमारास पोलिसांना दोन व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली, त्यापैकी एकाला गोळी लागली असून दुसऱ्याला काठीने वार करण्यात आले आहे. (Bihar News Update)

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणाला सदर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि त्याला धिराळा पीएमसीएचमध्ये रेफर केले. विक्रम कुमार राम असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Clash Over B.R Ambedkar Statue
Sharad Pawar : सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात ,शरद पवार ; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला शुभारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com