

Climate Summit
esakal
Antalya: संयुक्त राष्ट्रांच्या ३१ व्या हवामान परिषदेला (COP31) तुर्कियेतील अंटाल्या येथे आजपासून सुरवात झाली. ९ ते २० नोव्हेंबरदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत जवळपास २०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यंदा हवामान बदलाच्या पारंपरिक मुद्द्यांसोबत युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ऊर्जा असुरक्षितता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) वाढणारी विजेची मागणी हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहेत.