esakal | Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात
sakal

बोलून बातमी शोधा

recovery rate improved

मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाल्याचे दिसले आहे.

Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभर कोरोनाची दुसरी लाट आली असताना भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशातील रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाल्याचेही दिसले आहे. सध्याचा देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.48 टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. जागतिक पातळीवर पाहिलं तर भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वात कमी ठरला आहे. 

22 राज्यांतील मृत्यूदर देशाच्या सरासरीपेक्षा कमी- 
दिलासादायक बाब म्हणजे देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर देशाचा सरासरीपेक्षा कमी आहे. रिकव्हरी रेटचे आकडे पाहिले तर त्यातही मोठी सुधारणा झाल्याचे दिसले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.81 हा दादरा नगर हवेली आणि दिव व दमण या केंद्रशासित प्रदेशात आहे. राज्यांचा विचार केला तर आंध्रप्रदेशचा नंबर लागतो. आंध्रप्रदेशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 96.59 टक्के आहे. त्यानंतर बिहार ( 96.53), आसाम (96.1), तामिळनाडू (95.90) आणि ओडिशात 95.45 टक्के कोरोनाचा रिकव्हरी रेट आहे.

Coronavirus : कोरोनावर मात करण्यात पुणेकरांची आघाडी

78 लाख 68 हजार 968 जण कोरोनामुक्त-
मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या नवीन 45 हजार 674 रुग्णांचे निदान झाले असून 559 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 85 लाख 7 हजार 754 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 78 लाख 68 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

तसेच सध्या कोरोनाचे 5 लाख 12 हजार 665 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 49 हजार 82 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चाचण्यांचं प्रमाण वाढलं-
देशातील कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोना चाचण्यामुळे कोरोनाच्या प्रसारास थांबवण्याच सरकारला मोठं यश मिळत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 11 लाख 94 हजार 487 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा 11 कोटी 77 लाख 36 हजार 791 वर गेल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)