esakal | Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

updates of corona

दिवाळीच्या अगोदर कोरोना रुग्णवाढीचा प्रतिदिन आकडा 30 हजारांच्या खाली गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार भारतात वाढत असल्याचे दिसत आहे.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: दिवाळीच्या अगोदर कोरोना रुग्णवाढीचा प्रतिदिन आकडा 30 हजारांच्या खाली गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार भारतात वाढत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार 209 रुग्णांचं निदान झालं असून 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 90 लाख 95 हजार 807 झाला आहे.

दिवाळीनंतर वाढत आहेत रुग्ण-
तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 33 हजार 227 वर गेली आहे. तर सध्या देशभरात 4 लाख 40 हजार 962 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा कमी होत होता पण दिवाळीनंतर याला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या पुढे-
दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशात 85 लाख 21 हजार 617 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांत कोरोनाचे 43 हजार 493 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

चाचण्यांची संख्या 13 कोटींच्या वर-
 कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारकडून अजून चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण मागील काही दिवसांपुर्वी प्रतिदिन चाचण्यांची संख्या 8 लाखांच्या खाली गेल्या होत्या. शनिवारी देशात 10 लाख 75 हजार 326 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 13 कोटी 17 लाख 33 हजार 134 चाचण्या पार पडल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)