Corona: देशाला पुन्हा कोरोनाचा विळखा; 'या' राज्यांत मास्क सक्ती, आज 'मॉकड्रिल'

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोना
कोरोनाई सकाळ

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. (Corona Cases Masks Are Mandatory In Three States Today Mockdrill )

दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत.

तसेच, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

रविवारी गेल्या 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या 32,814 वर पोहोचली आहे. शनिवारी 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात वेगाने रुग्ण आढळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com