पंधरा दिवसांच्या निर्बंधांनी काय होणार? महाराष्ट्रात लशीकरणासाठी लागणार सहा महिने

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस राज्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
पंधरा दिवसांच्या निर्बंधांनी काय होणार? महाराष्ट्रात लशीकरणासाठी लागणार सहा महिने

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस राज्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या देशात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येपैकी एकतृतीयांश रुग्णसंख्या ही एकट्या महाराष्ट्रातून सापडत आहे तर नव्या मृतांपैकी एक चतुर्थांश मृत रुग्ण हे महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लशीकरण करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1.1 कोटी डोस दिले गेले आहेत परंतु परिस्थितीची तीव्रता पाहता यापेक्षा जास्त मागणी आहे.

जर आपण दोन कोटी लोकांना येत्या दोन महिन्यांमध्ये लस दिली तर त्याचा निश्चितच महाराष्ट्राला फायदा होईल. मात्र, जर लशीकरणाच्या प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली तर हे महाराष्ट्राच्या फायद्याचं ठरणार नाहीये, असं मत महाराष्ट्र कोविड-19 टास्कफोर्सचे टेक्निकल ऍडवायझर डॉ. सुभाष साळुंखे यांनी मांडलंय. पुढील दोन महिने हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण कमीतकमी 20 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचणे अवघड असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वय वर्षे 45 ते 59 वयोगटातील लोकांना सरासरी दिले जाणाऱ्या दुसऱ्या डोसच्या संख्येवर आधारित आकडेवारी दाखवते की राज्यात दररोज सरासरी 1.65 लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे. याचा अर्थ येत्या दोन महिन्यांमध्ये जवळपास 1 कोटी लोकांचं लशीकरण केलं जाऊ शकतं. याचा अर्थ 45 ते 59 वयोगटातील सर्वांचंच लशीकरण पूर्ण व्हायला अजून 78 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलिकडेच एक पत्र लिहून वय वर्षे 25 च्यावरील वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी, अशी विनंती केली होती. लशीकरणाच्या सध्यस्थितीतील दरानुसार, वय वर्षे 25 ते 44 वयोगटातील प्रत्येकाला लशी देण्यास 200 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र त्या तुलनेत लशीकरणाचा दर पुरेसा नाहीये. एकूण 120 लशीकरण केंद्रांपैकी 70 केंद्र लशीच्या अभावी बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्याच रविवारी दिली होती. राज्याकडे लस देण्याची सगळी यंत्रणा सक्षम आहे मात्र, पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध केली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. महाराष्ट्र राज्यात काल एका दिवसात 60,212 नवे रुग्ण आढळले आहेत. तर काल राज्यात 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जर याच दरानुसार रुग्णांमध्ये वाढ होत राहिली तर येत्या 59 दिवसांमध्ये रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. सध्या देशातील कोरोना मृत्यूदर 1.2 आहे तर एकट्या महाराष्ट्रातील मृत्यूदर 1.7 टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com