esakal | हॉस्पिटलमधील तब्बल 20 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; दिल्लीतील परिस्थिती विदारक

बोलून बातमी शोधा

हॉस्पिटलमधील तब्बल 20 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; दिल्लीतील परिस्थिती विदारक
हॉस्पिटलमधील तब्बल 20 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; दिल्लीतील परिस्थिती विदारक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीमध्यो कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या बरंच चिंतेचं वातावरण आहे. हॉस्पिटल्समधील ऑक्सिजनच्या कमतरतेची समस्या सुरुच आहे. दिल्ली सरकारचे प्रयत्न, हायकोर्टाचा हस्तक्षेप, केंद्र सरकारकडे मागणीनंतरही दिल्लीच्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशातच दिल्लीतून आलेल्या एका बातमीमुळे मन हेलावून जाईल, अशी परिस्थिती आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे डॉ. डीके बालूजा यांनी म्हटलं की आमच्याकडे फक्त अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. इथे 200 हून अधिक रुग्णांचं आयुष्य धोक्यात आहे. आम्ही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 लोकांना आधीच गमावून बसलो आहे.

हेही वाचा: Corona: झाला असेल वा झाल्याची शंका असेल; वाचा काय करावे आणि काय करु नये

दोन हॉस्पिटल्सची दिल्ली हायकोर्टात धाव

दिल्लीच्या आणखी दोन हॉस्पिटल्सनी मेडीकल ऑक्सिजनच्या तातडीच्या पुरवठ्यासाठी शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अशा सर्व हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्सना कोर्टाने म्हटलंय की, जर रुग्णांच्या उपचारासाठी त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्यांनी सर्वांत आधी दिल्ली सरकारच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा. यादरम्यानच केंद्राने दावा केलाय की, या प्रकारच्या समस्यांसाठी एक सेंट्रल व्हर्च्यूअल रुम बनवली गेली आहे, जी लवकरच सक्रिय होईल.

गेल्या 24 तासांत 24,331 नवे रुग्ण

दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शुक्रवारी 24,331 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये संक्रमित होण्याचा दर 32.43 टक्के आहे. दिल्ली शहरात गेल्या 11 दिवसांत तब्बल 2,100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.