esakal | दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांमध्ये दुप्पट अँटीबॉडीज : Survey
sakal

बोलून बातमी शोधा

corona antibodies

दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांमध्ये दुप्पट अँटीबॉडीज : सर्व्हे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात लवकरच तिसरी लाट येण्याची (corona third wave) शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अद्यापही देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट टळलं की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, डॉक्टरांनी अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यामध्ये अद्यापही अँटीबॉडीज (antibodies) आहेत. त्यामुळेच तिसऱ्या लाटेचा तितका प्रभाव दिसत नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: मानसिक आरोग्य दिन |कोरोना काळात भारतातील मुलं नैराश्याच्या गर्तेत!

अमर उजालाने दिलेल्या बातमीनुसार, आग्रा येथे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनची लागण झालेल्या लोकांमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक अँटीबॉडीज दिसून आल्या. ज्या लोकांनी आतापर्यंत लसीकरण केलेले नाही, अशा लोकांचा हा सर्व्हे आहे. एसएन मेडिकल कॉलेजच्या ब्लड ट्रांसफ्युन मेडिसिन विभागाध्यक्ष डॉ. नीतू चौहान यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या १२१ लोकांची अँटीबॉडीज चाचणी करण्यात आली. यामध्ये कोरोनाची लस न घेतलेल्या लोकांचा सहभाग आहे. या लोकांमध्ये १०० से १००० आईयू/एमएल अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

दरम्यान, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की त्यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. टेस्ट केल्यानंतर त्यांना डेल्टा स्ट्रेनची लागण झाल्याचे पुढे आले होते. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट अँटीबॉडीज आहेत. आतापर्यंत २५८० लोकांची अँटीबॉडीज टेस्ट करण्यात आली आहे.

loading image
go to top