
नवी दिल्ली- जगासह देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असताना हे संकट केव्हा जाईल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र, भाजप नेत्याला या प्रश्वाचे उत्तर मिळाल्याचं दिसत आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन होऊन जेव्हा कामाला सुरुवात होईल, तेव्हा देशातील कोरोना महामारी संपेल, असं वक्तव्य भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी बापानेच 4 महिन्यांच्या चिमुकलीला विकलं
भगवान राम यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांचा नायनाट करण्यासाठी पूनर्जन्म घेतला होता. आताही तसेच घडेल. राम मंदिराचे बांधकाम एकदा का सुरु झाले, की कोरोना महामारी नष्ट होण्यास सुरुवात होईल, असं शर्मा म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शर्मा यांचे वरील वक्तव्य आलं आहे. कोरोनामुळे केवळ भारत नाही, तर जगही हैराण झालं आहे. अशात शारीरिक अंतर पाळण्याबरोबरच देवाचं नामस्मरही करायला हवं, असंही शर्मा म्हणाले आहेत.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या तीन दिवसात एक लाखांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शिवाय देशात कोरोनामुळे जवळजवळ ३० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संकट भयंकर बनत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या कार्यक्रमासाठी १५० जणांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, कोरोना स्थिती भिषण बनत असताना भूमिपूजनचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने विरोधकांनी टीका सुरु केली आहे.
बापरे! मास्क न घालणाऱ्यांना हुकूमशाहा किम जोंग उन देणार ही क्रूर शिक्षा
दरम्यान, राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरल्यानंतर आता मंदिराचं नवं डिझाइन समोर आलं आहे. थ्रीडी डिझाइनमध्ये राम मंदिर आणखी भव्य दिसत आहे. यात मंदिराचे शिखर उंच असल्याचंही दिसतं. मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट निखिल सोमपुरा यांनी मंदिराचे डिझाइन केलं आहे. राम मंदिराचे पहिले डिझाइन 1985-86 मध्ये तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन डिझाइन तयार केलं होतं. मात्र आता संभाव्य गर्दीचा विचार करता डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. यात मंदिराच्या आकारात बदल करण्यात आला. मंदिराची लांबी, उंची वाढवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.