कोरोनाचे थैमान सुरुच; 144 नवे रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

बिहारने पंजाबला टाकले मागे

पटना : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आता देशासाठी चिंतेचा विषय बनत आहे. देशात सव्वालाख कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तसेच यामध्ये मृतांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र, नवी दिल्ली, पंजाबनंतर आता बिहारमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या बिहारमध्ये 2310 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होती. कोरोना व्हायरसची संसर्ग साखळी तोडण्यासाठी देशातील विविध राज्य सरकारकडून उपाययोजना सुरु आहेत. त्यानंतर आता बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या नितीशकुमार यांच्या सरकारसाठी एक आव्हान बनत आहे. बिहारमध्ये सध्या 2310 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी बिहार सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी यापूर्वीच पॅकेजची घोषणा केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार सातत्याने बैठका घेत आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना 4 लाख देण्याचा निर्णय झाला होता.

बिहारने पंजाबला टाकले मागे

बिहारमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. बिहारने कोरोना रुग्णांच्या बाबतीत पंजाबला मागे टाकले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त राज्यांमध्ये बिहारचे नाव आले आहे. मागील आठ दिवसांत कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवाशांच्या खात्यात प्रत्येकी एक हजार

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय झाला. राज्यातील 100 जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या निवासस्थानांची सोय केली आहे. याशिवाय बिहार सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत 20 लाख प्रवाशांच्या खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Infected Patient increases in Bihar