esakal | गोव्यात नाईट कर्फ्यू; दहावी-बारावीच्या परीक्षाही ढकलल्या पुढे

बोलून बातमी शोधा

गोव्यात नाईट कर्फ्यू; दहावी-बारावीच्या परीक्षाही ढकलल्या पुढे
गोव्यात नाईट कर्फ्यू; दहावी-बारावीच्या परीक्षाही ढकलल्या पुढे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पणजी : देशात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून देशातील अनेक राज्यांमधली परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात आज संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा राज्यामध्ये देखील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गोव्यात आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोविड विषाणू प्रसार रोखण्यासाठी गोव्यात आजपासून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही व्यवस्था कायम असेल. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. यापुढे १५ दिवसांची पूर्वकल्पना देऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

हॉटेल, बार, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, थिएटर, मल्टीप्लेक्स,कसिनो, बससेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज उच्च पातळीवर बैठक घेतली. त्यानंतर ११ मंत्री, २८ आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यानंतर सायंकाळी ही‌ उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.